दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पळसदरी गावातील जिल्हा परिषद शाळेत भारताचा स्वातंत्र्यदिन गावातील विद्यार्थ्याच्या हस्ते करण्यात आले. दहावी मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी सार्थक अविनाश निगुडकर याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
पळसदरी येथील रायगड जिल्हा परिषद शाळा पळसदरीच्या शालेय समितीने मागील निर्णयाप्रमाणे गावातील मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गावामध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल त्या विद्यार्थ्याने 15 ऑगस्टला ध्वजारोहण करावे आणि बारावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक विद्यार्थ्याने 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण करून झेंडा फडकवण्याचा मान सार्थक अविनाश निगुडकर याला मिळाला आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शालेय समितीचे सदस्य ॲड. प्रदीप सुर्वे, महेंद्र शिंदे तसेच ॲड. राजेंद्र निगुडकर आणि पळसदरी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.