| उरण | वार्ताहर |
उरण तहसील कार्यालयाजवळ तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच उरण न्यायालय, उरण, न्हावा शेवा, मोरा सागरी पोलीस ठाणे, उरण नगर परिषद, उरण पंचायत समिती, जेएनपीए बंदर, इतर शासकीय कार्यालय, महाविद्यालय, प्राथमिक शाळा, विविध प्रकल्प, चिरनेर व जासई येथील हुतात्मा स्मृती स्तंभ, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच, अधिकारी, मुख्याध्यापक व इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आदिवासी मुलांनीही राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हर घर तिरंगा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला हाक देत घरोघरी तिरंगा फटकविण्यात आला होता. यावेळी गावा गावात शिक्षकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभात फेरीचे आयोजन केले होते. यावेळी आ. महेश बालदी, माजी आ. मनोहर भोईर, मुख्याधिकारी राहुल इंगले, पं.स.चे एस.पी. वाठारकर, उद्योगपती पी.पी.खारपाटील, राजाशेठ खारपाटील, जासई सरपंच संतोष घरत, चाणजे सरपंच अमिताभ भगत, धुतूम सरपंच सुचिता ठाकूर, बोकडविरा सरपंच अर्पणा पाटील, कोप्रोली सरपंच अलका म्हात्रे, बांधपाडा सरपंच विशाखा ठाकूर, म्हातवली सरपंच रंजना पाटील, विंधणे सरपंच निसर्गा डाकी, चिर्ले सरपंच सुधाकर पाटील, पागोटे सरपंच कुणाल पाटील, सोनारी सरपंच पूनम कडू आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच विंधणे येथील आदिवासी बांधवांना रेशनकार्ड, विविध दाखल्यांचे वाटप तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या हस्ते करण्यात आले.