रूग्णांची संख्या 42 हजारांच्या वर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात गेल्या 24 तासांत 42 हजार 618 कोरोनाबाधित आढळले असून 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या 3 कोटी 29 लाख 45 हजार 907 झाली आहे. तर एकूण मृतांची संख्या 4 लाख 40 हजार 225 झाली आहे. गेल्या 24 तासांत 36 हजार 385 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 3 कोटी 31 लाख 1 रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशभरात 58 लाख 85 हजार 687 जणांना कोरोनाची लस देण्यात आली. लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 67.72 कोटी लोकांचं लसीकरण झालंय.

Exit mobile version