अॅड. दिनेश तिवारी यांचा आरोप
| पेण | प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये प्रमोद दिनानाथ केणे यांच्याविरुद्ध एका महिलेने गुन्हा दाखल केला होता. तो पूर्ण गुन्हा चुकीचा व सुडबुद्धीने केला असून त्यामध्ये कोणतीही सत्यता नसल्याचा आरोप उच्च न्यायालयाचे वकील दिनेश तिवारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. पोलिसांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात आम्ही फिर्याद नोंदवली असून आम्ही न्यायालयाकडे आमच्या अशिलावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागितली आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
गुन्हा नोंदवणारी व्यक्ती 1994 ला 12 वर्षाची होती. तिने घरातून 12 तोळे सोने व साडेतीन लाख रुपये रोख रक्कम घेउन बाहेर पडली. त्यानंतर वर्षभर गाणगापूर परिसरात राहिली होती, असा आरोपही तिवारींनी यावेळी केला.
पूर्ण गुन्हयाचे कथानक हे काल्पनिक व दिशाभूल करणारे आहे. आमच्या अशिलाने उच्च न्यायालयात ज्यावेळेला दाद मागितली त्यावेळेला न्यायालयाने त्यांना त्वरीत जामीन देउन सदरील गुन्हयाबाबत ताशेरे ओढले आहेत. माझे अशील प्रमोद केणे यांच्यावर चुकीचे आरोप करुन नाहक त्रास दिला आहे. तसेच पोलीसांनी शहानिशा न करता गुन्हा नोंदविला आहे. म्हणून आम्ही पोलीसांनविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. व हा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रवृत्त करणार्या व्यक्तीविरुद्ध देखील मानहानीचा दावा केलेला आहे. असे शेवटी दिनेश तिवारी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी दिनेश तिवारी, अॅड. प्रमोद केणे, हेमंत दांडेकर व तिवारी यांचे सहाय्यक उपस्थित होते.