| रायगड | प्रतिनिधी |
रस्ता सपाटीकरणाच्या स्थितीत होत नाही, तोपर्यंत ही लढाई जनतेसाठी सुरूच राहणार आहे. संघर्षातून लोक विकास फक्त शेकापच करू शकतो. अनेक वेळा निवेदन देण्यात आली आहेत. मात्र, त्याची ठोस कार्यवाही झाली नाही. म्हणून आत शेकापने उग्ररुप धारण केले आहे. अलिबाग – पेण रस्त्याचा ठेका मावळमधील एका ठेकेदाराला दिला आहे. यातील 13 कोटी खड्डे बूजविण्यात खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नक्की कुठल्या रस्त्यांचे खड्डे बुजविले असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याला येतील भूगोल माहिती नाही, त्या ठेकेदाराला रस्त्याचे काम दिले आहे. शेकापच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. परंतु, त्यांना फारसे यश आले नाही. मात्र, त्यांचाही समाचार लवकरच घेतला जाईल असा इशारा शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला.

ॲड. मानसी म्हात्रे पुढे म्हणाल्या की, पुन्हा एकदा आयुष्याच्या मशाली पेटविण्याची वेळ आली आहे. स्व.नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. मीनाक्षी ताई पाटील यांची ही कर्मभूमी आहे. या भूमीतून त्यांनी अनेक लढे, आंदोलने केले आहेत. त्यामुळे या भूमीचा एक वेगळा इतिहास आहे. रस्त्यांवरील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतू सत्ताधारी, व प्रशासन मुजोर झाले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहेत. शेतकरी कामगार पक्ष हे कदापी सहन करणार नाही. अन्न, पाणी निवारा याच बरोबर वीज पाणी व चांगला रस्त्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.या खड्डेमय रस्त्याला जबाबदार स्वतःला दमदार समजणारे तसेच प्रशासन व शासन आहे. सर्वसामान्यांच्या घामातून, कष्टातून मिळविलेला पैसा कराच्या रुपात शासन जमा होतो. त्याच पैशातून रस्ता व इतर सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या न्याय हक्कासाठी बोलण्याचा अधिकार आहे, असे ॲड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले.

लढ्याची दखल घ्यावीच लागणार - ॲड. गौतम पाटील
शेकाप नेते जयंत पाटील यांनी प्रयत्न करून रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला. मात्र सत्ताधाऱ्यांनी तो निधी वितरीत न करता, तसाच ठेवला. 2019 पासून दमदार कामगिरी जगजाहीर आहे. निधी आणल्याचा दिखावा सत्ताधाऱ्यांनी जाहिरातबाजी करून केला. परंतु रस्त्यांची अवस्था बिकट आहे.खड्डे नसून या रस्त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खोटे आश्वासन देण्याबरोबरच सोशल मिडीयावर शो बाजी करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य माणूस पिचला गेला आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव सणदेखील खड्ड्यातून गेले. आता दिवाळी सण आला आहे. मात्र हा सण सर्वसामान्यांना खड्डयातून जाऊ देणार नाही. खड्डयांविरोधात शेकापने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा लढा यशस्वी होणार असून त्याची दखल प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.







