15 जणांनी घेतली माघार
21 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा अनारक्षित करून घेण्यात येत असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गा जागांसाठी होणार्या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीतून 21 जागांसाठी 102 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननीमध्ये 23 अर्ज अवैध ठरले. त्यानंतर आता आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 76 पैकी 15 उमेदवारींनी माघार घेतली. त्यामुळे आता रिंगणात 60 उमेदवार शिल्लक राहिले असून त्यांच्यात लढत रंगणार आहे.
जिल्ह्यातील सहा पैकी खालापूर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी 5 अर्ज शिल्लक होते. त्यापैकी 2 अर्ज मागे घेण्यात आले तर एक अर्ज डमी असल्याने आता 2 उमेदवार रिंगणात असल्याने त्यांच्यात सरळ लढत होईल. माणगावसाठी 4 प्रभागातील 4 जागांसाठी एकुण 16 अर्ज दाखल होते. त्यापैकी 6 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर 10 उमेदवारांमध्ये निवडणूक रिंगणात लढत रंगणार आहे. म्हसळा नगरपंचायतीसाठी वैध 8 अर्जापैंकी एकही मागे घेण्यात न आल्याने रिंगणात 8 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. पोलादपूरात वैध 12 उमेदवारांपैकी एकही उमेदवारांनी माघार न घेतल्याने त्यांच्यात चार प्रभागाता चार जागांसाठी लढत होईल. तळा नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी वैध 18 उमेदवारांपैकी चार जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर 14 जणांमध्ये लढत रंगणार आहे.अर्ज वैध ठरले आहेत. पालीत 17 वैध उमेदवारांपैकी 3 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवारांमध्ये 4 जागांसाठी लढाई होईल. ओबीसीतून खुल्या प्रवर्गात गेलेल्या या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर 19 जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाईल.