नेमबाजांची घोडदौड सुरूच

पुरुषांना सुवर्ण, महिलांना रौप्यपदक ; ट्रॅप शूटिंगमध्ये दिमाखदार कामगिरी


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. शूटिंगमध्ये रविवारी भारताने आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने शूटिंगच्या ट्रॅप पुरुष सांघिक कामगिरीमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. तर, महिला संघाने रौप्यपदक पटाकवले. भारताच्या एकूण पदकांची संख्या 41 वर पोहोचली आहे. के. चेनाई, पृथ्वीराज आणि जोरावर या त्रिकुटाने भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. भारतीय नेमबाजांनी शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदकावर नाव कोरले. महिला संघातील राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीती रजक यांनी टीम ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले.

नेमबाजांकडून पदकांची लयलूट
भारतासाठी शूटिंगमधून सर्वाधिक पदके आली आहेत. नेमबाजांनी दमदार कामगिरी केली आहे. शूटिंगच्या विविध इव्हेंट्समधून भारताला आतापर्यंत 21 पदके मिळाली आहेत. यामध्ये सात सुवर्ण, सहा रौप्य आणि आठ कांस्यपदकांचा समावेश आह. घोडेस्वारी, स्क्वॅश, महिला क्रिकेट आणि टेनिस मिश्र या प्रकरात भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 41 पदकांचा समावेश आहे. यामध्ये 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्यपदकांचा समावेश आहे.

कयनन चेनाईला कांस्य
भारताचा नेमबाज कयनन चेनाईने वैयक्तिक 50 मीटर ट्रॅप शुटिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. दरम्यान, सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघातही त्याचा समावेश होता. आता त्याने वैयक्तिक ट्रॅप शुटिंग प्रकारात कांस्य पदक जिंकून एका दिवसात दुसरे पदक आपल्या खिशात टाकले.

Exit mobile version