| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंदुरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेली राजची बायको सोनमने आपला गुन्हा कबुल केला. त्याचसोबत सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबतचा पहिला फोटो समोर आला.
सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांचा एकत्र असलेला एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये सोनम आणि राज खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोवरून असे दिसून येते की दोघांमध्ये फक्त मैत्रीपूर्ण संबंध नव्हते. आतापर्यंत राजचे मित्र आणि ओळखीचे लोक असा दावा करत होते की राज सोनमला दीदी म्हणत होता. पण आता या फोटोवरून सोनम आणि राज यांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि राज यांचा हा फोटो हत्येपूर्वीचा आहे आणि कदाचित तो इंदूरमध्ये कुठेतरी काढला गेला असावा असे सांगितले जात आहे. मेघालय पोलिस आणि इंदूर गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासात असे दिसून आले आहे की हत्येच्या काही दिवस आधी सोनम आणि राज यांनी इंदूरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकत्र वेळ घालवला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मेघालय पोलिसांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा यांना समोरासमोर आणले. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले ठोस पुरावे दाखवले आणि पोलिसांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारानंतर सोनम अखेर तुटून पडली. शिलाँग पोलिसांनी घटनेनंतर सोनमचे मारेकऱ्यांशी झालेल्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले. त्याचसोबत घटनास्थळी सापडलेल्या सोनमच्या शर्टचा फोटोही दाखवण्यात आला. यानंतर सोनम रघुवंशीने एसआयटीसमोर आपला गुन्हा कबुल करत नवरा राजला मारल्याचे सांगितले.