। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जतमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे. मात्र जर हा बैल तस्करांमुळे पिसाळला असेल, तर त्याचे जबाबदार गोतस्कर यांना धरायला हवेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा. पोलीस तपास करतील, अशी अपेक्षा आहे. बैलाला रेबीज झालं असेल हा निकष कोणी काढला आहे, असा आरोप ॲड. ऋषीकेश जोशी यांनी केला आहे.
दिवाळी सण साजरा होत असताना कर्जत शहरात पिसाळलेल्या एका बैलाने एकाचा बळी घेतला, तर सात जणांना जखमी केले आहे. त्या पिसाळलेल्या बैलाना पकडण्यासाठी रेस्क्यू टीम तैनात करावी लागली. नंतर पकडण्यात आलेल्या बैलाला जेसीबीमध्ये भरून डंपिंग ग्राऊंडवर नेले होते. त्यावेळी नीट हाताळता न आल्याने हा बैल मृत पावला की भूल दिल्याने हा मृत पावला, हा एक वेगळा विषय आहे. पोलिसांनी मौन न बाळगता याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.
बैलाच्या हल्ल्याच्या कारणांची चौकशी व्हावी: ॲड. जोशी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606