। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडीकडे जाणार्या रस्त्याची वाट अतिशय खडतर व बिकट झाली आहे. ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी खेटे मारून अधिकार्यांना जनतेच्या वेदना जाणवत नसल्याने रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे. या रस्त्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष आश्विनी ठाकूर उपोषणास बसणार आहेत.
या सबंधीचे पत्र रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड व महासचिव वैभव केदारी यांनी पेण तहसीलदार यांना दिले आहे. सदर पत्रात नमूद केले आहे, की मुंगोशी बौद्धवाडीकडे जाणारा मार्ग अरुंद असल्याने व वाट पूर्णपणे खडतर असल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. हे प्रशासनाचे अपयश असून अनुसूचित जातीवर उघड उघड अन्याय होत असल्याचा तीव्र संताप रिपब्लिकन सेनेने व्यक्त केला आहे.