हाळ रस्ता चार दिवसांत उखडला

कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह
। रोहा । प्रतिनिधी ।
विरजोली ते हाळ या सुमारे तीन किमी रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.सदर रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.पण या रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित अभियंता येत नसल्याने ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.सदर रस्त्यावर चार दिवसांपूर्वी ठेकेदाराने बीबीएम केले.परंतु रस्त्यावर कमी रहदारी असून देखील चार दिवसातच या रस्त्यावर करण्यात आलेले बीबीएम उखडल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. या रस्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधित अभियंता वर्गाने लक्ष द्यावे अशी मागणी हाळ ग्रामस्थ करत आहेत.

Exit mobile version