| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-वडखळ महामार्गावरील तिनविरा हा थांबा एसटी महामंडळाने 10 वर्षांपूर्वी जलद थांबा मंजूर केला. या थांब्यावर जलद गाड्या थांबत नसल्यामुळे गैरसोय होते. याबाबत विभागीय नियंत्रक कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या. ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांच्या नेतृत्वाखाली या थांब्याजवळ 7 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको कार्यक्रम आयोजिला आहे, असे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर यांनी सांगितले.