रस्ते चकाचक, वाहने सुसाट

मजगांव स्थानकादरम्यान गतीरोधकांची मागणी

| कोर्लई | वृत्तसंस्था |

नुकतेच साळाव-मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील डांबरीकरण काम प्रगतीपथावर असून बहुतांशी रस्ता चकाचक झाल्याने रस्त्यावर वाहनाचा वेग वाढला असून पादचारी, प्रवासी वर्गाची डोकेदुखी ठरत असून मुरुड तालुक्यातील मजगांव स्थानकादरम्यान अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन या ठिकाणी गतीरोधक बसविण्यात यावेत.अशी मागणी जोर धरत आहे.

पर्यटनात मुरुड जंजिरा, काशिद बीचवर मौजमजा मस्ती, आनंद लुटण्यासाठी शनिवार रविवार व सुटीच्या दिवशी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची रेलचेल असून या रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात तसेच काही वेळा ट्रॅफिक जॅम ला देखील सामोरे जावे लागते. त्यातच आता रस्ता चकाचक झाल्याने वाहने सुसाट वेगाने जात असून अपघाताची भिती वाढल्याचे भिती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी यात लक्ष पुरवून मजगाव स्थानकादरम्यान गतीरोधक बसविण्यात यावेत. अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version