| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील मालडुंगे गावाच्या हद्दीत झालेल्या दोन मोटार सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू, तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मैद्या पांडू चौधरी हे मयत झाले आहेत. तर मधु निरगुडा, साहिल निरगुडा, दिलीप निरगुडा हे जखमी झाले आहेत. मालडुंगे गावाजवळ उतारावर हा अपघात झाला असून, या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पनवेल पोलीस करीत आहेत.