| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गांवरील माणगांव नजिक नाणोरे गावाजवळ बायपास रस्त्याचे फाउंडेशनचे काम सुरू असून, या फाउंडेशनच्या खड्ड्याचे काम करतांना शनिवारी (दि.28) दोन मगरीची पिल्ले दिसून आली याची माहिती स्थानिक नागरिक यांनी वनविभाग व रेस्क्यू टीमला देण्यात आली. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही मगरीना सुरक्षित बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील महामार्गाच्या चौपदरीकणाचे काम गेली अनेक वर्षांपासून सुरु असून, याचे काम अंतिम टप्यात आहे. तेथे काम करणाऱ्या कामगारांना दोन मगरी दिसून आल्या. त्यांनी तात्काळ ही माहिती ग्रामस्थांना दिली. नाणोरे गावचे शंकर सावंत यांनी याची माहिती वनविभाग तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला देण्यात आली. घटनास्थळी रेस्क्यू टीम व वनविभागाचे खात्याचे कर्मचारी दाखल झाले. रेस्क्यू टीमचे अध्यक्ष सागर दहिंबेकर व त्यांच्या संपूर्ण टीम सदर घटनेची पाहणी केली असता त्या ठिकाणी साधारण दोन ते अडीच वर्षांची, अंदाजे तीन फूट लांबीची दोन मगरींची पिल्ले आढळून आली.त्या मगरीच्या दोन पिल्लांना सुरक्षित बाहेर काढून सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले.
सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेने दिले दोन मगरींना जीवदान
