| पनवेल | वार्ताहर |
आरक्षित करून ठेवलेल्या सदनिका परस्पर विकल्या प्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील पायोनियर विभागात उभारलेल्या अक्षय डेव्हलपर्स पायोनियर गृहनिर्माण संस्थेमध्ये असलेल्या 6 आरक्षित करून ठेवलेल्या सदनिका बांधकाम व्यवसायिकाने परस्पर विक्री केल्याने याबाबतची तक्रार पायोनियर को.ऑप चे सचिव गंगाराम सामंत यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार भा.द.वि. कलम 409, 420, 406, 34 सह महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्स बाबत अधिनियम सण 1963 (एमओएफए ) कलम 3, 8, 13 नुसार गुन्हा दाखल करून या प्रकणारी पी सुरेश भाताडे याला मुंबई परिसरातून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरक्षक विनोद लबडे व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.