। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत पक्षालाच आव्हान दिल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. आत्तापर्यंत हा गट पुन्हा मुंबईत येऊन पक्षासोबत तडजोड होऊ शकेल, असा अंदाज वर्तवला जात होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरल्याची माहिती समोर येत आहे. ‘शिवसेना बाळासाहेब’ असं गटाचं नाव ठेवलं आहे.