। रसायनी । वार्ताहर ।
शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेणे हे आता आणखी गरजेचे झाले आहे, त्यामुळे माती परीक्षण करून घ्या,असे प्रतिपादन खार जमीन संशोधन केंद्राचे मृदु शास्त्रज्ञ डॉ.मनोज वहाणे यांनी केले आहे.
कृषी विभागाकडून कृषी संजीवनी मोहीम हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मंडळ कृषी अधिकारी खालापूर यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक येथे कृषी शिबीर आयोजित केले होत. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले आपल्याला जमिनीचे भौतिक,जैविक आणि रासायनिक गुणधर्माच्यामारी माहिती बरोबर,अन्न द्रव्याच्या माहितीचे आदानप्रदान कळते.याकरिता एकात्मिक अन्न द्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.गांडूळ खत, कंपोस्ट खत,जिवाणू खतांचा वापर कसा करावा याची परिपूर्ण माहिती दिली.खतांचा समतोल वापर कसा करावा याची माहिती तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी दिली.
स यावेळी चौक मंडळातील सुमारे 80 शेतकरी उपस्थित होते.विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, मंडळ कृषी अधिकारी जयसिंग देशमुख,तालुका कृषी संघटनेचे अध्यक्ष मुंढे, परिसरातील अनेक शेतकरी यांच्या बरोबर कृषी सहायक नितीन महाडिक , शिवाजी राठोड, सारंग,चौधरी,शिंदे,पाटील,ग्रामविकास अधिकारी एस. पी.जाधव हेही उपस्थित होते.कार्यक्रमानंतर तुपगाव येथे लागवड केलेल्या बियान्यांची पाहणी करण्यात आली.