| पनवेल | वार्ताहर |
वडिलांच्या नावावर असलेल्या चार फ्लॅटचे बनावट भाडेकरार बनवून त्यावर वडिलांच्या खोट्या सह्या करून परस्पर भाड्याने देत भाड्यापोटी मिळणारी 17 लाख 40 हजार रुपयांची रक्कम स्वतःकडे ठेवत वडिलांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. सेवानिवृत्त प्रकाश पाटील (71), रा. नवीन पनवेल यांच्या करंजाडे परिसरात मालकीच्या असलेल्या चार फ्लॅटचे बनावट भाडेकरार आरोपी प्रशांत पाटील (49), रा. नवीन पनवेल याने बनवून त्यावर वडिलांच्या खोट्या सह्या करून परस्पर भाड्याने देत भाड्यापोटी मिळणारी 17 लाख 40 हजार रुपयाची रक्कम स्वतःकडे ठेवत वडिलांची आर्थिक फसवणूक केली. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात मुलाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुलाने केली वडिलांची 17 लाख 40 हजारांची फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809