। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात असलेल्या नाका कामगार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कुशल कामगार संघटना प्रयत्न करीत आहे. या कामगारांच्या मागण्यांचा सरकारकडून विचार केला जात आहे. दरम्यान, येथील एका नाका कामगाराच्या मुलाकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आल्यानंतर त्याने घेतलेल्या कामाबद्दल शासनाने अनुदान दिले आहे.
माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी इतर कोणतेही व्यावसायिक दृष्ट्या साधन नाही. आपल्या कलागुणातूनच नाका कामगार उदरनिर्वाह्यासाठी माथेरानमध्ये छोटे-मोठे कामे करत असतात. गेल्या अनेक पिढ्या माथेरानमध्ये स्थानिक सुतार, गवंडी, प्लंबर, इलेक्ट्रिशन, वेंल्डर्स आणि बिगारी काम करत आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी कोणी पुढ आले नव्हते. मागील पाच वर्ष स्वतः सुतार काम करत असलेले चंद्रकांत सुतार यांनी पुढाकार घेऊन माथेरानमधील किमान 50 कामगारांना एकत्र केले आणि कुशल कामगार संघटना स्थापन केली.
त्या संस्थेची नोंद शासन दरबारी केली आणि नंतर त्यांना कामगार कार्ड मिळवून दिले. अशा या नाका कामगार यांना कामगार कार्डाचा लाभ दिल्यानंतर आता कुटुंबीयांच्या भवितव्याविषयी प्रयत्न सुरू आहेत. कुशल कामगार संघटना यांनी आता कामगारांच्या मुलांचे शिक्षण तसेच अकाली मृत्यू नंतर अशा दहा ते बारा विविध गोष्टींसाठी या कार्डचा लाभ मिळावा यासाठी संघटना काम करीत आहे.
या सर्व गोष्टींची माहिती घेऊन मागील पाच वर्षांपूर्वी माथेरानमधील जे काम करत आहेत. त्यांना एकत्र करून कुशल कामगार संघटना स्थापन करून कामगारांसाठी त्यांच्या भवितव्यसाठी विशेष प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग वेल्डिंग काम करणारे सचिन नीचिंदे यांचा मुलगा दहावी पास झाला. त्यानंतर कुशल कामगार संघटना यांनी नीचींदे यांच्या मुलासाठी कामगार कार्डद्वारे क्लेम केला. त्यानंतर कुशल कामगार संघटना यांनी पाठपुरावा केला आणि नंतर एक महिन्याच्या वीस हजार रुपयांचा हप्ता त्यांच्या बँकेत जमा झाला आहे. त्यामुळे एक प्रकारे माथेरानमधील नाका कामगारांना आता कुशल कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सुतार यांनी कामगारांच्या भवितव्य विषयी सुरू केलेले प्रयत्न यशस्वी ठरताना दिसत आहेत.