। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक कमाविलेल्या प्रोफेशनल एजुकेशन सोसायटीचे विवा कॉलेजतर्फे तालुक्यातील माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील मस्जिद मोहल्ल्याचे माजी अध्यक्ष महामूद धुंदवारे यांना सरलादेवी मंगल कार्यालय हॉल माणगाव येथे कॉलजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण कार्यक्रमात दिलदार पुरस्कार, विजय मेथा यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सामाजिक सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास विवा कॉलेजचे प्राचार्य विवेक ढेपे, माणगाव नगरीचे माजी नगरसेवक सिराज परदेशी, विवा कॉलेजच्या चेअरमन विनय ढेपे, उद्योजक विजय मेथा, आदर्श शिक्षिका विनया जाधव, उपप्राचार्य योगेश रानभरे, प्रा.विजय बक्कम, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शिक्षकवर्ग, पालक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामूद धुंदवारे हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील रहिवाशी असून मुस्लिम समाजाबरोबरच बहुजन समाजातील विविध उपक्रमात ते झोकून देऊन काम करीत असतात. त्यामुळे धुंदवारे यांनी बहुजन समाजात आपली विशेष अशी ओळख निर्माण केली आहे. धुंदवारे हे मुस्लिम समाजाचे नेते असून समाजाच्या उन्नतीसाठी ते विशेष प्रयत्नशील असतात त्यांच्या या कार्याची दखल माणगाव विवा कॉलेजने घेत त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.