तटबंदीतील भुयारी मार्ग अडगळीत

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा समुद्रकिनारी पोर्तुगिज कालीन आगरकोट किल्ला आहे. या किल्लाच्या तिन्ही बाजूस समुद्र असल्याने या किल्ल्याला भली मोठी दगडी तटबंदी आहे. या तटबंदीच्या आत जाण्यासाठी दोन-तीन ठिकाणी भुयारी मार्ग आहेत. परंतु, सध्या या भुयारी मार्गावर झाडेझुडपे वाढल्याने ते बंद झाले आहेत. शिवाय पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने आतमध्ये पाणी साचते. काही वर्षांपूर्वी स्थानिक युवकांनी त्यातील एका भुयारी मार्गाची साफ सफाई केली होती. त्यांनतर कोविड काळात सर्वत्र संचारबंदी असल्याने हे काम थांबविले गेले. रेवदंडा दैवज्ञ ब्राम्हण समाजाचे ऐतिहासिक पांचाळेश्वर मंदिरात सुद्धा एक भुयारी मार्ग आढळतो. हा भुयारी मार्ग थेट आगरकोट किल्लातील तटबंदीशी निगडीत असल्याचे सांगितले जाते. पुरातत्व खात्यासह स्थानिक राजकीय, सामाजीक क्षेत्रातील मंडळीने हे भुयारी मार्ग व पुढील दालनांच्या स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेतल्यास ते पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल, अशी मागणी इतिहासप्रेमी मंडळी करत आहेत.

Exit mobile version