| बोर्ली पंचतन | प्रतिनिधी |
दिघी सगरी पोलीस ठाणे हद्दीतील गोंडगर गावचे हद्दीत एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत मिळून आले होते. त्याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मयताचे ओळख पटवण्याकरिता प्रभारी अधिकारी हनुमंत शिंदे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत तसेच बोर्ली पंचतन, गोंडघर, वडवली भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून सदर इसमाचे नाव शशांक शरद कुडाळकर, वय 51 असून, तो बोर्ली पंचतन, तालुका श्रीवर्धन येथील राहणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
तपासामध्ये मयताची प्रामाणिक माहिती प्राप्त केल्यानंतर त्याचे नातेवाईक भाऊ अजित शरद कुडाळकर यांना मयताची ओळख पटवण्याकरता आणले होते. त्यांनी पाहणी करुन तो आपला भाऊ शशांक शरद कुडाळकर हाच असल्याचे सांगून त्याचा घटस्फोट होऊन तो एकटाच राहात असल्याचे सांगितले. तो म्हसळा पंचायत समिती येथून सेवानिवृत्त झाला असल्याचे सांगितले. त्यांना मयताचे शरीरावर डोक्यास पाठीवर व हातापायांपी जखम असल्याचे दिसून आल्याने मयत याचा कोणत्याही अज्ञात कारणावरून कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून जीवेठार केल्याचे दिसून आले. सदर खुनाचा संशयित आरोपी म्हणून संदीप चंद्रकांत पवार, राहणार खंनोलौशी, ता. श्रीवर्धन आदिवासी वाडी, प्रकाश लक्ष्मण वाघमारे सध्या राहणार खंनोलौशी, ता. श्रीवर्धन यांनी सदर गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे. या आरोपींना दिघी सागरी पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास दिघी सागरी पोलीस करीत आहेत.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना 24 तासांत अटक
