| नेरळ | वार्ताहर |
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर आषाने येथे पारले बिस्किटांचा टेम्पो उलटला. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही. परंतु, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. कर्जतहून कल्याणच्या दिशेने निघालेल्या पारले कंपनीचे बिस्कीट भरलेला टेम्पो आषाने गावाजवळ येताच रस्त्यावर असलेल्या वळणावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उलटला. वाहनाचा वेग जास्त असल्याने हा टेम्पो रस्त्यावरून काही अंतरापर्यंत घसरतदेखील गेल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगत होते.सुदैवाने अपघाताच्या वेळेस रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.