चिपळुणात वाजणार तिसरी घंटा

थिएटर 1 नोव्हेंबरपासून होणार सुरु
दिवाळीनिमित्त तिकीट दरात खास सवलत

। चिपळूण । वार्ताहर ।
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चिपळुणात तिसरी घंटा वाजणार असून, 1 नोव्हेंबरपासून थिएटर सुरु होणार आहेत. त्यामुळे चिपळूणवासियांच्या आनंदाला उधाण आले आहे. चिपळूणमधील प्रतिष्ठित उद्योजक महेंद्रकुमार शर्मा यांनी मालकी हक्काने खरेदी केलेल्या पूर्वीच्या पूजा थिएटरचे आता एम.के. थिएटर्स नावाने नामकरण झाले असून, येत्या सोमवार, दि. 1 नोव्हेंबरपासून एम.के. थिएटरमध्ये रसिकांना नवनवीन हिंदी, मराठी चित्रपटांचा प्रत्यक्ष आनंद घेता येणार आहे. दिवसभरात तीन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

खास आकर्षण म्हणजे, अभिनेता अक्षयकुमारचा 5 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभर प्रदर्शित होणारा ङ्गसूर्यवंशीफ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच एम.के. थिएटर्सने रसिकांना दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात म्हणजे, पूर्वीचे 100 रु. तिकीट दर असलेले तिकीट आता 80 रु., 150 रु. असलेले तिकीट 120 रु., तर 200 रुपये असणारे तिकीट दर आता 160 रुपये असणार आहे. सोमवारी घरगुती पद्धतीने शर्मा कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये एमके थिएटर्सचे उद्घाटन होणार आहे.

Exit mobile version