माथेरानमध्ये अश्‍वशर्यतींचा थरार

। माथेरान । प्रतिनिधी ।

मे महिन्यातील शेवटच्या विकेंडला माथेरानच्या लालमातीत वीर हुतात्मा भाई क्रीडा संकुलात अश्‍व शर्यतींचा थरार पहायला मिळणार आहे. त्यामुळे मे महिन्यातील शेवटच्या विकेंडला माथेरान पर्यटनस्थळी पर्यटकांची तोबा गर्दी होणार आहे. माथेरान युथ सोशल क्लब व माथेरान नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने येथील वीर हुतात्मा भाई क्रीडा संकुलात अश्‍वशर्यतींचे आयोजन अनेक दशकांपासून करण्यात येत आहे. यामध्ये भाला रेस, बॉल अँड बकेट, ट्रॉटिंग रेस, रिले रेस तसेच अन्य शर्यतींचा समावेश आहे. मे महिन्यातील अखेरच्या हंगामात दाखल होणार्‍या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे सुट्ट्यांच्या शेवटच्या टप्प्यात माथेरान नगरीत अश्‍वशर्यतींचा थरार पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होणार असे बोलले जात आहे. हॉटेल्स, लॉज आरक्षित केले जात आहेत.

Exit mobile version