वानखेडेवर अनुभवणार आयपीएलचा थरार

। मुंबई । प्रतिनिधी ।

सद्या आयपीएसची धुम सुरू आहे. सगळेच आयपीएल क्रिकेट सामन्याचा आनंद लुटत आहे. रविवारी (दि.7) वानखेडे स्टेडियमवरील लाईव्ह आयपीएल क्रिकेटचा थरार आता बच्चे कंपनीला अनुभवायला मिळणार आहे.

वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामन्याचा आनंद मुलांना लुटता यावा यासाठी एज्युकेशन ऑफ स्पोर्ट्स अँड ऑल या संस्थेने तब्बल बेस्टच्या 500 एसी व नॉन एसी बसेस बुक केल्या आहेत. यामध्ये एका बसचे भाडे 12 ते 16 हजार रुपये इतके आहे. बेस्टला यामुळे चांगला महसूल मिळणार आहे. यामुळे बच्चे कंपनीला प्रत्यक्ष स्टेडियमवरुन लाईव्ह आयपीएल क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

Exit mobile version