| उरण । वार्ताहर ।
न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या हद्दीतील चांदणी चौक सिंगलवर बेशिस्त कंटेनर ट्रेलर चालकांनी उभ्या असलेल्या कंटेनर ट्रेलरला धडक दिल्याने अपघात झाला. सदर अपघात हा सोमवारी ( दि१६) दुपारच्या सुमारास घडला आहे. या अपघातात मोटारसायकल स्वार थोडक्यात बचावला आहे.
जेएनपीए बंदरातून मालाची आयात – निर्यात करणाऱ्या बेशिस्त कंटेनर ट्रेलर चालक हे सर्रासपणे नवखे असल्याने अशा नवख्या तरुण चालकामुळे वारंवार रस़्त्यावर अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.त्यामुळे अशा अपघातात नाहक निष्पाप प्रवाशी नागरीकांना, मोटारसायकल स्वारांना आपले प्राण गमवावे लागत आहे.सोमवारी ( दि१६) अशा प्रकारच्या बेशिस्त कंटेनर ट्रेलर चालकांनी उभ्या असलेल्या कंटेनर ट्रेलरला जेएनपीए बंदरा जवळील सिंगल वर धडक देण्याची घटना घडली आहे.या अपघातात कंटेनर ट्रेलरचे नूकसान झाले नाही तसेच चालकास दुखापत झाली नसली तरी मोटारसायकल स्वार थोडक्यात बचावला आहे.