सुकेळी खिंडीत खड्डा चुकवताना ट्रेलर पलटी

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील खांब गावच्या हद्दीत सुकेळी खिंडीच्या उतारावर नागोठणेकडून पास्को कंपनीकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यातील खड्डे चुकवताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यामध्ये सुदैवाने ट्रेलर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागोठणेकडून विळे येथे पास्को कंपनीकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर (एमएच 46 एएफ 5015) सुकेळी खिंडीत उतारावर आला असता पलटी झाला. या अपघातात चालक आझाद खान (26) हा जखमी झाला असूर्नें त्याला वाकण महामार्ग पोलिसांनी उपचारासाठी जिंदाल रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करुन त्याला सोडण्यात आले. अधिक तपास महामार्ग पोलीस केंद्र वाकण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी.सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version