170 वर्षानंतर प्रथमच धावणार ट्रेन

कोकण-गोव्यात जाणार्‍यांसाठी ठरणार फायदेशीर

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईहून कोकण आणि गोव्याला जाणासाठी वांद्रे टर्मिनसहून मडगावसाठी नव्याने ट्रेन सुरू झाली आहे. 29 ऑगस्ट रोजी बोरिवली मडगाव जंक्शन येथून नवीन गाडीचा शुभारंभ झाला. विशेष म्हणजे तब्बल 170 वर्षानंतर पहिल्यांदाच वसई पनवेल वरून ट्रेन कोकणात जाणार आहे. पश्‍चिम रेल्वेने सुरू केलेली ही ट्रेन कायमस्वरुपी आठवड्यातून दोन दिवस असेल. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांना या ट्रेनचा फायदा होणार आहे.

आठवड्यातून दोन दिवस धावणार ट्रेनवांद्रे टर्मिनल ते मडगाव जंक्शन ही गाडी वांद्रे येथून बुधवार आणि शुक्रवारी सुटेल तर मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी सुटेल. मडगाव जंक्शन वांद्रे टर्मिनल (10116) आणि वांद्रे टर्मिनल मडगाव जंक्शन (10115) या क्रमांकाने या नवीन गाड्या धावणार आहेत. ही गाडी वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, बीड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि करमाळी या स्थानकावर थांबेल. तर खेडलादेखील थांबा दिला जावा अशी मागणी आहे.

वांद्रे टर्मिनसहून येथून ही ट्रेन सकाळी 6.50 मिनिटांनी सुटेल. बोरिवलीला 7.23 वाजता, वसई रोडला 7.50 वाजता, भिवंडी रोडला 8.50 वाजता, पनवेलला 9.55 वाजता, रोहा 11.15 वाजता, वीर 12.00 वाजता, चिपळूणला 13.25, रत्नागिरीला 15.35, कणकवलीत 18.00, सिंधुदुर्ग 18.20, सावंतवाडी रोड 19.00 वाजता थिविमला 20.00, करमाळीला 20.30 तर मडगावला 22.00 वाजता पोहोचेल. रोहा आणि रत्नागिरीत ट्रेन 5 मिनिट तर वसई रोडला 25 मिनिटं थांबेल.

Exit mobile version