शिवसेनेकडे मुस्लिमांचा ओढा वाढतोय

उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
अंतुले समर्थक कार्यकर्त्यांचा

| नेरळ | प्रतिनिधी |
शिवसेनेत मुस्लिम धर्मीय यांचे प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत, राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठणकावून सांगत भाजपवर निशाणा साधला. माजी मुख्यमंत्री बॅरीस्टर अंतुले यांचे कट्टर समर्थक रियाज बुबेरे यांच्यासह कर्जत तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत कर्जत तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.हा प्रवेश सोहळा मुंबई येथील शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुभाष देसाई, अरविंद सावंत, वैभव नाईक,जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, मनोहर भोईर, नितीन सावंत, भाई शिंदे, उत्तम कोळंबे, सुनील पाटील, बाबू घारे, प्रथमेश मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

.कर्जत तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते आणि जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रियाज बुबेरे यांनी आपले समर्थक यांच्यासह उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.प्रवेश करणार्‍या प्रमुख कार्यकर्ते यांच्यात विद्यमान उपसरपंच प्रकाश निरगुडे, माजी सरपंच आवेश जुवारी,परशुराम भर, काळूराम पुंजारा,माजी उपसरपंच असीम बुबेरे, सलाम शेख,दशरथ यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते संतोष बदे,संतोष राणे तसेच साळोख, पोशिर,कळंब,ओलमन,या तीन ग्रामपंचायत मधील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आम्ही धडाकेबाज कामगिरी करीत पुढे वाटचाल करीत आहोत.पण हो आपल्या विरुद्ध बोलेले त्याला चिरडून टाकण्याचे काम हुकुमशाही कडे देशाला नेणारे करीत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. नेते सुभाष देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सुमन लोंगले, प्रदीप ठाकरे, देविदास पाटील, शशिकांत मोहिते,दिनेश भोईर, नीलिमा थोरवे, संपत हडप, लक्ष्मण पोसाटे, अविनाश भासे,समीर साळोखे, शेळके,भगवान पाटील,आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version