ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

89 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना जाहीर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर लक्ष लागून राहिले आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या 89 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वेध लागले असून लवकरच या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

मागील तीन वर्षाहून अधिक काळ महानगरपालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषद, पंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. प्रदिर्घ कालावधीनंतर नगरपरिषद, महानगर पालिकांच्या निवडणुका झाल्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. आता ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत संपणार आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील सासवणे, पेझारी, वाघोडे, मानतर्फे झिराड.

पेण तालुक्यातील काळेश्री, बोर्झे, वाकरूळ, खारपाले, कामार्ली, आंबेघर, जोहे.पनवेल तालुक्यातील बारवई, साई, सावळे, खानाव, वलप, आकुर्ली, हरिग्राम, खैरवाडी, नानोशी, पोसरी, खानावले, उमरोली, आपटा, पालीदेवद, कोळखे, सांगुर्ली,मोर्बे, उसर्ली खुर्द, पाले बुद्रुक, देवळोली, केवाळे, वाकडी, वाजे, वारदोली. उरण तालुक्यातील चाणजे, केगांव, नागाव, म्हातवली, फुंडे,वेश्वी. कर्जत तालुक्यातील कोल्हारे, जिते, पोशिर, साळोख तर्फे वरेडी, हुमगांव, कडाव, वैजनाथ, भिवपूरी, दामत. रोहा तालुक्यातील रोठ बुद्रूक, रोख खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, धामणसई, मालसई, महाळुंगे, शेडसई, तिसे, वरसे, वरवठणे, खांब, पळस, कोंडगाव, ऐनघर, चिंचवली तर्फ दिवाळी, वाशी, वावे पोटगे, गोवे, निडी तर्फे अष्टमी.

माणगांव तालुक्यातील बामणोली, देवळी, लोणेरे, लाखपाले, टेमपाले. महाड तालुक्यातील नरवण, भेलोशी, मांडले, आसनपोई, बिरवाडी, कोकरे तर्फे नाते. श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले, कारिवणे, गालसुरे, दिघी, पाभरे, केल्टे, लिपणीवावे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याची सुरुवात 20 फेब्रुवारीपासून झाली आहे. तहसीलदार यांनी गुगल अर्र्थचे नकाशे गावांचे अंतिम नकाशे केले आहेत. 27 फेब्रुवारीला तलाठी, ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे. प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना मान्यतेसाठी पाठविणे. प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करून त्यात आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अथवा प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविणे. प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना मागविणे. प्रभाग रचना अंतिम करणे आदी प्रक्रीया राबविली जाणार आहे. ही प्रक्रीया 4 मेपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींवर दृष्टीक्षेप
अलिबाग - 4
पेण - 07
पनवेल - 24
उरण - 06
कर्जत - 09
रोहा - 21
माणगांव - 05
महाड - 06
म्हसळा - 03
श्रीवर्धन - 04
एकूण - 89
Exit mobile version