‘विकासकामांच्या जोरावर गीतेंचा विजय निश्‍चित’

| शिहू | वार्ताहर |

विकासकामांच्या जोरावर अनंत गीतेंचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास महाविकास आघाडीचे शेकाप नेते तथा कुर्डुस ग्रा.पं.चे माजी सरपंच संदीप पाटील यांनी व्यक्त केला. अनंत गीते हे विक्रमी मतांनी विजयी होण्यासाठी अलिबाग तालुक्यातील कुर्डुस, सांबरी, अवेटी, नामदेवनगर, कोंझरवाडी, कामथवाडी, चिंभ्रण ठाकूरवाडी, दुर्गदर्या, बीडवागले येथे संदीप पाटील व सर्व कार्यकर्ते गावागावात जाऊन मतदारांसोबत संपर्क करून प्रचारात आघाडी घेत आहेत.

आदिवासी वाड्यांवर आपण केलेल्या विकासकामांची पोचपावती नक्की मतदार देतील व अनंत गीते निश्‍चितच विक्रमी मतांनी निवडून येतील, असा दृढ विश्‍वास संदीप पाटील यांनी केला आहे. या प्रचार दौर्‍यात त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सारिका पाटील, माजी सरपंच रामचंद्र कर्वे, संतोष पाटील, सुनील म्हात्रे, कलेंद्र पाटील, राजेश पाटील, शेखर शेळके, तुकाराम पाटील, कुमार गदमले, चंद्रकांत पाटील, जयेश पाटील, चंद्रकांत नाईक, संदीप नाईक, धनाजी नाईक, कुमार शेळके, धर्मदास पाटील, मुरलीधर पाटील, अशोक पाटील, लीलावती पाटील, वैजयंता पाटील, सुनीता म्हात्रे आदी कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभत आहे.

Exit mobile version