विकासकामांच्या जोरावर उमेदवारांचा विजय नक्कीच

चित्रलेखा पाटील यांचे तळ्यात प्रतिपादन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
तळा तालुक्यातील नगर पंचायत करिता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मधून रोशनी निलेश तळेकर तर प्रभाग 10 मधून संस्कृती हर्षद वेदक यांच्या प्रचारा करिता शेकाप महिला आघाडी प्रमुख, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आपलं एक मत देईल गावच्या विकासाला साथ, विकास कामांच्या जोरावर उमेदवारांचा विजय नक्कीच होईल असे चित्रलेखा पाटील यांनी संगितले.
या प्रसंगी तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड, आर. डी. सी. बँक संचालक ज्ञानेश्‍वर भोईर, उमेदवार रोशनी निलेश तळेकर, संस्कृती हर्षद वेदक, अ‍ॅड. कस्तुब धामणकर, युवा नेते लहुशेठ चव्हाण, बाबू शिंदे, चंद्रकांत तळेकर, निलेश तळेकर, गोविंद हिरवे, नरेश मोरे, दिलीप लोखंडे, संदीप जगताप, हेमंत शेठ टिळक, कानू विचारे, हर्षद वेदक, शशिकांत वेदक, केतकी टिळक, सोनम चव्हाण इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version