अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नागोठणे जवळ शीव येथे जलवाहिनी फुटल्याने एम आय डी सी कडून अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. परिणामी आज दिनांक 6 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच एमआयडीसीकडून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर शहराला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. उद्या दिनांक 7 नोव्हेंबर व 8 नोव्हेंबर 2021 रोजी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा अपव्यय करू नये. असे आवाहन अलीबाग नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे,.
जलवाहिनी फुटल्याने एम आय डी सी कडून अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा आज बंद
