जिते येथे चालणार उपप्रादेशिक परिवहन पेणचे कामकाज


| रायगड | प्रतिनिधी |

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयास गट नं.28/1 मौजे जिते या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या शासकीय जागेत रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते शनिवारी (दि.23) इमारतीचा उद्घाटन सोहाळा संपन्न झाला.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मुख्यालय जुनी इमारत विकासस्मृती व पेण-खोपोली बायपास रोड येथे सुरु असलेले कामकाज टप्प्या टप्प्याने मौजे जिते येथे हलविण्यात येणार आहे. पेण-खोपोली बायपास रोड येथे करण्यात येणारी अनुज्ञप्ती चाचणी, नवीन वाहन नोंदणी, जुन्या वाहनांची पुर्ननोंदणी इत्यादी सर्व प्रकारचे कामकाज (दि.1) एप्रिलपासून मौजे जिते येथे नवीन कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात करण्यात येणार आहे. तसेच विकासस्मृती या इमारतीमध्ये सुरु असलेले कामकाज टप्प्या टप्प्याने मौजे जिते येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. सर्व वाहन मालक, चालक तसेच नागरिकांना या बदलाबाबत अवगत करण्यात येत असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मौजे जिते येथील नवीन इमारतीत सर्व कामकाज सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेणतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version