वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांचे गौरवोद्गार
| चिरनेर | प्रतिनिधी |
ग्रामीण भागात आधुनिक सोयी सुविधा उपयुक्त शाळा उभारण्याची संकल्पना पी.पी. खारपाटील साहेबांची आहे. त्यांनीच हा पाया रचला. आता त्यावर कळस चढविण्याचे काम दादांबरोबर राजाशेठ खारपाटील हे करत आहेत. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढत आहे. त्या अनुषंगाने त्यांना अपेक्षित असलेले शिक्षण देण्याचे काम पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून केले जात आहे. असा खारपाटील बंधूंच्या गौरवस्पद कार्याचा उल्लेख उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी आपल्या भाषणातून केला.
चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. 2) जानेवारी रोजी पार पडला त्यावेळी ते उद्घाटन पर भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पी.पी. खारपाटील, एकनाथ पाटील, राजेंद्र खारपाटील, के. एन.शेट्टी, अमरसिंह राऊत, समीर खारपाटील, सागर खारपाटील, परीक्षित ठाकूर,वर्षा खार पाटील, सुनिता खारपाटील, अर्चना ठाकूर, व्ही.ए. पाटील, एम.एन. पट्टेबहादूर, सुप्रिया पाटील, सुरेश पाटील, अलंकार परदेशी, रमाकांत पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
या शाळेच्या शिक्षकांकडून तुम्हाला ज्ञानाचे धडे दिले जात आहेत. त्या शिक्षकांना मी सन्मान देतो. या शाळेने आधुनिकतेकडे झेप घेतली आहे. सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, धार्मिक अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या खारपाटील बंधूंची ही किमया असून त्यांच्या कार्याचा मी गौरव करतो, असे उद्गार जितेंद्र मिसाळ यांनी शेवटी काढले.
तर ग्रामीण भागातील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे विद्यार्थी नॅशनल स्पर्धेत भाग घेऊन विजयी झाले. त्यांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त केले. त्यामुळे ही गोष्ट शाळेच्या दृष्टीने अभिमानाची आहे. शाळेची प्रगती पाहता सतत उंचावत आहे. या शाळेचा दहावी, बारावीचा निकालही कौतुकास्पद आहे. येथे बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. पण यापुढे या शाळेत पदवीपर्यंत शिक्षण दिले जाईल. असे दादांचे स्वप्न आहे ते लवकरच पूर्णत्वास जाईल. असे सांगून, पैसा संपत्ती हा प्रारब्धाने प्राप्त होते. परंतु चांगले गुण मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात. पैशापेक्षा माणसाच्या गुणांना महत्त्व आहे.
सुरुवातीला मुख्याध्यापक एम.एन. पट्टेबहादूर यांनी प्रास्ताविक केले. तर पर्यवेक्षक आनंद चिर्लेकर मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे यांनी अहवाल वाचन केले. पवार यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता मसुरकर यांनी आभार व्यक्त केले.