। खोपोली । प्रतिनिधी ।
आडोशी पाझर तलावाचे काम पाटबंधारे विभागाकडून गेल्या वर्षापासून सुरू आहे. पिचींग करताना तळ्यातील दगडे, माती वापरली जात आहे. तेथील दगड, माती चांगल्या दर्जाची आहे का? हे तपासणीसाठी एकही अभियंता फिरकत नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी वरीष्ठ अधिकार्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे वर्ष लोटले तरी तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. ठेकेदाराला पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी पाठीशी घातल्यामुळेच तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची संतापजनक प्रतिक्रिया आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. तसेच, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा तलावावर जन आंदोलन करणार असल्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.