उरण-खारकोपर रेल्वे मार्गाचे काम वेगाने

। उरण । वार्ताहर ।
उरण -खारकोपर रेल्वे मार्गावरील बहुतेक अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गाचा कामाला वेग आला असून उरण स्टेशन ही प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे उरण करांचे लवकरच रेल्वेचे स्वप्न साकार होणार आहे. नेरुळ ते उरण रेल्वे मार्गामधील नेरुळ ते खारकोपर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र खारकोपर ते उरण या 14 किलोमीटर च्या दरम्यान वनविभागाची आणि शेतकर्‍यांची भूसंपादनाची प्रकिया पूर्ण नव्हती त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता .आता ती प्रकिया पूर्ण झाली आहे. मधल्या काळात जासई येथील शेतकर्‍यांना साडेबारा टक्के देण्याच्या सिडकोच्या विलंबामुळे काम बंद केले होते.

मात्र पोलीस बंदोबस्तात तोही अडथळा दूर होऊन आता मात्र रेल्वेच्या कामाला जोरदार सुरवात झाली आहे. रेल्वे कडे रेल्वे चे ट्रक टाकण्याचे तंत्र नव्याने आले आहे त्यामुळे उरण पासून ट्रॅक टाकले जात आहे. रांजणपाडा येथील जुने असणारे ट्रॅक बदलून नवीन टेक्नॉलॉजी ने टाकण्यात आले आहे. तसेच उरणच्या स्टेशनचे ही काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. हे काम जानेवारी 2023 ला कार्यनिवित करण्यात येणार असल्याची माहिती सिडको अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. रेल्वेमुळे उरण द्रोणागिरी नोड निवासी वसाहतीमध्ये वाढ होणार आहे पैशांची बचत होणार आहे.व्यापारी वर्गाला व्यापार्‍याला चालना मिळणार आहे.मच्छविक्रेत्याना ही या रेल्वेचा फायदा होणार आहे.तसेच अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. रिक्षा मालकांना ही धंदा मिळणार आहे.

Exit mobile version