पेणमध्ये वाईनच्या दुकानात चोरी

लपून बसलेल्या चोरट्यास अटक
। पेण । वार्ताहर ।

पेण शहरातील आर. के वाईन्सच्या दुकानात घुसून गल्ल्यातील रोकड चोरी करून दुकानाच्या पोटमाळ्यावर जाउन लपलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. पेण शहरातील पेण खोपोली रोडवर आर.के.वाईन्सच्या दुकानात घुसून आरोपीत रा.कुंभारआळी, ता.पेण याने दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम एकूण 2,400/-रूपये चोरी करून दुकानाच्या पोटमाळयावर लपून बसला. त्याला घरफोडी चोरी करण्यासाठी मदत करणारा त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

Exit mobile version