वाडापेठ ग्रामपंचायत कार्यालयात चोरी

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील वाडापेठ ग्रामपंचायत कार्यालयातील कपाटे फोडून 79 हजार रूपयांची रोडक लंपास करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पंचायत समिती सदस्य अभिजित तेली यांनी भेट दिली असून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे.

छोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांची प्रशासकीय सुट्टीनंतर कर्मचारी नेहमीप्रमाणे सोमवार सकाळी ग्रामपंचायत कार्यालय उघडायला गेले. यासमयी त्यांना कार्यालयाचे कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले. कार्यालयात प्रवेश केल्यानंतर तेथील स्थिती पाहता त्यांनी नाटे पोलीस ठाण्यासह संपर्क साधला. या संपर्कानंतर पोलिसांनी इमारतीची पाहणी केली असता पंचायत कार्यालयात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी श्‍वानपथकास पाचारण करण्यात आले असले तरी शोध घेण्याचा अनुषंगाने ठोस माहिती वा दिशा मिळाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version