| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील पळस्पे येथे उभ्या असलेल्या गाडीची चोरट्यांनी काच फोडून गाडीतील रोख रक्कम, टॅब व लॅपटॉप असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब यांनी त्यांची गाडी पनवेल जवळील पळस्पे फाटा येथील अरहित अस्पायर रेसिडेन्सीअल प्रोजेक्ट येथे उभी ठेवली होती. गाडीजवळ कोणी नसल्याचा फायदा घेत त्या ठिकाणी दोन चोरटे मोटार सायकलवरुन त्या ठिकाणी आले. त्यांनी उभ्या असलेल्या गाडीची काच फोडून लिओनो कंपनीचा काळ्या रंगाचा लॅपटॉप, सॅमसंग 5 जी टॅबलेट व रोख रक्कम असा मिळून जवळपास 74 हजाराचा ऐवज चोरला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.