| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सीईआयआर पोर्टलचा प्रभावीपणे वापर करुन तांत्रिक तपासादरम्यान 48 मोबाईल व 1 लॉपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. हस्तगत केलेला मुद्देमाल एकुण 8 लाख 5 हजार किंमतीचा असून, तो मुळ मालकांना हस्तांतर करण्यात आला आहे.
नागरिकांना हरवलेल्या मोबाईल फोनबाबतची तक्रार नोंदविण्याकरीता भारत सरकारद्वारे सीईआयआर पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्या तक्रारींची दखल घेत तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर निकम यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध राज्यातून आतापर्यंत एकुण 8 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात 48 मोबाईल फोन व 1 लॉपटॉपचा समावेश आहे. हे हस्तगत केलेले मोबाईल फोन व लॉपटॉप मुळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या हस्ते परत केला आहे. मोबाईल व लॅपटॉप परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त करुन मनापासुन कौतुक केले आहे.