| पनवेल | वार्ताहर |
कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बंदी असलेला गुटखा व पानमसाला यांची बेकायदेशीर विक्री सुरु असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांनी विविध ठिकाणी धाडसत्र केले. या कारवाईत 15 हजार 556 रूपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला असून, तींघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अरंविद श्रीकृष्ण साहू, महेशप्रसाद श्रीसिताराम महंतो व लक्ष्मण कारू प्रसाद असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्याचबरोबर कामोठे वसाहतीमध्ये गुटखा पुरवठा करणारा आरोपी ओमकार गुप्ता फरार झाला आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडे, पोलीस शिपाई ओंकार आंबवले, गोरे, तायडे, पवार, अहिरे व चालक पाटील यांनी ही कारवाई केली आहे.