सोन्याच्या दागिन्यांची चोरी

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून चांभार्ली येथील बालाजी हाईट्स रूममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. कल्पेश पाटील यांनी आपल्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार रसायनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कल्पेश पाटील यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करून 2 लाख 40 हजार रूपये किंमतीचे 8 तोळे वजनाचे मंगळसूत्र, सोन्याच्या पट्टया त्यात काळेमणी असा ऐवज चोरून नेला आहे.

Exit mobile version