राहत्‍या घरातून पैशांची चोरी

| माणगांव | वार्ताहर |

माणगांव तालुक्यातील निजामपूर गावातील महिलेच्या राहते घरातून पर्समधील एका पाऊचमध्ये ठेवलेले 25 हजार रुपये घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला आहे.

सदरची घटना गुरुवार दि. 26 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेची फिर्याद कमलेश देविदास अहिरे (37) रा. सरेकर आळी निजामपूर ता. माणगाव मूळ यांनी बुधवार दि.1 रोजी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी कमलेश देविदास अहिरे यांच्या राहते घरामध्ये फिर्यादी यांच्या पत्नीच्या काळ्या रंगाच्या पर्स मधील राखाडी रंगाच्या मिनी पाऊचमध्ये ठेवलेली 25 हजार रुपयांची रक्कम कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दारातून घरात प्रवेश करून चोरून नेली. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुणतुणे हे करीत आहेत.

Exit mobile version