रामवाडी-पेण येथे 50 हजारांची चोरी

सोन्या, चांदीचे दागिने केले लंपास

पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील रामवाडी एसटी कॉलनी येथील फिर्यादीच्या मालकीच्या 49 हजार 900 रुपये किंमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चोरटयाला 32 तासांत पेण पोलिसांनी जेरबंद केले.

याबाबतचे वृत्त असे की, पेण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 06 जुलै रोजी दुपारी 3:15 वा सुमारास फिर्यादी रा.एसटी कॉलनी  रामवाडी ता.पेण यांच्या मालकीचे एकूण 49 हजार 900/-रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरटयाने मौजे एसटी स्टॅन्ड कॉलनी रामवाडी ता.पेण फिर्यादी यांचे संमतीशिवाय स्वतःचे फायदयकरीता लबाडीचे हेतुने चोरून नेल्याची घटना घडली. सदर गुन्ह्यातील आरोपीस दुसर्‍या दिवशी दिनांक 07 जुलै 2021 रोजी 32 तासातच अटक करण्याची कामगिरी पेण पोलिंसांनी केली आहे. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदारश्री.भोजकर हे करीत आहेत.

Exit mobile version