मंदिरातील दानपेटीची चोरी

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील जुना शेवा गावातील शंकर मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या शंकर मंदिराची देखभाल संतोष शिवराम दर्णे हे करीत असत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारीत मंदिरातील स्टील व लोखंडी अशा दोन दानपेट्या चोरून नेल्याचे 15 सप्टेंबर रोजी दर्णे यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यात देऊन तक्रार दाखल केली. स्टील व लोखंडी या दोन दानपेटीतील अंदाजे 12 हजारांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश फुले हे करीत आहेत.

Exit mobile version