रेवस कोळीवाडा येथुन दुचाकीची चोरी

मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील गॅरेज च्या बाहेर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवुन नेलयाची घटना घडली आहे. मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 08:00 वा ते दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 08:00 वा च्या दरम्यान फिर्यादी रा.रेवस कोळी वाडा अलिबाग यांची हिरो-स्प्लेंडर कंपनीची लाल रंगाची मोटारसायकल रेवस कोळी वाडा अलिबाग येथील फिर्यादी यांच्या गॅरेजच्या बाजुला लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख हे करीत आहेत.

Exit mobile version