अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मैत्रिणीकडे जात आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तालुक्यातील खंडाळे येथून अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3:00 वा सुमारास महिला फिर्यादी रा.खंडाळे ता.अलिबाग यांची मुलगी वय 17 वर्षे ही मैत्रीणीकडे जात असताना कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावुन पळवुन नेले. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार झिराडकर हे करीत आहेत.